डॆअरी डॆ तर्फे २ प्रीमियम आईस क्रीम टब्स लाँच
पुणे : डेअरी डे या या भारतातील आघाडीच्या आईस्क्रीम ब्रँडतर्फे प्रीमियम आईस क्रीम टब्स – रेड वेल्वेट आईस्क्रीम आणि चोको केक & फज आईस्क्रीम लॉन्च करण्यात आले आहे . हेनवीन प्रिमिअम आईस क्रीम टब्स टब्स कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, पॉंडिचेरी व गोवा येथील शहरांमधील सर्व प्रमुख आऊटलेट्समध्ये उपलब्ध ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. रेड वेल्वेट आणि चोको केक आणि फज आईस्क्रीम्सची किंमत ४८० मिली टब्ससाठी प्रत्येकी २९९ रूपये आहे. एका टबमध्ये जवळपास ५व्यक्ती आईस्क्रीम चा आस्वाद घेऊ शकतात.
डेअरी डेच्या रेड वेल्वेट आईस्क्रीम मध्ये चीज आणि एगलेस रेड वेल्वेट केक आहे. यामध्ये रेड वेल्वेट केक व चेरीच्या तुकड्यांसह रेड वेल्वेट फ्लेवर्ड क्रीमबेसचे मिश्रण आहे. डेअरी डेच्या चोको केक & फज मधील एगलेस चॉकलेट केक मध्ये चोको केक, चॉकलेट सिरप व क्रीमी चॉकलेट अशा मिश्रणातून हे आईस्क्रीम बनवण्यात आलं आहे आईस्क्रीमचे चविष्ट संयोजन असलेल्या या आईस्क्रीमची चव चाखलीच पाहिजे अशी आहे.
डेअरी डेचे संचालक एम. एन. जगन्नाथ म्हणाले की डेअरी डे नेहमीच आईस्क्रीमच्या चाहत्यांना आनंद देणारी उत्पादने निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि आम्हाला ग्राहकांसाठी प्रिमिअम आईस्क्रीम्स सादर करण्याचा आनंद होत आहे. या रेड वेल्वेट व चोको केक फज आईस्क्रीम्सची चव अप्रतिम आहे आणि आमच्या फॅक्टरीमधील संशोधनानंतर उत्पादित करण्यात आले आहेत. डेअरी डे ब्रॅण्ड वैशिष्ट्यपूर्ण फ्लेवर्ससाठी ओळखला जातो आणि बाजारपेठेत नाविन्यपूर्ण नवीन उत्पादने सादर करण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो. डेअरी डे यंदा उन्हाळ्यामध्ये अप्रतिम नवीन फ्लेवर्स लॉंच करणार आहे.
