fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsPUNE

पीएमपीएमएल च्या बस डे ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : कोविड १९ साथीच्या काळात, प्रवासी निर्बंधांमुळे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोविड पूर्वीचे प्रवासी संख्येचे उद्दिष्ट साध्य करणे, लोकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा यासाठी प्रवृत्त करणे आणि कार व  दुचाकींकडे कायमचे स्थलांतर टाळणे महत्त्वाचे आहे.
एकट्या पुण्यात दरवर्षी सुमारे २ लाख नवीन कार आणि दुचाकी रस्त्यावर येतात.  २०२० मध्ये पुण्याला वाहतूक कोंडी मध्ये जगातील ५ वे शहर असे घोषित केले गेले. बसेस, कार पेक्षा १० पट अधिक कार्यक्षम असतात. या शहराने व नागरिकांनी बस वापराला प्राधान्य दिल्यास, शहराला आपली शाश्वततेची ध्येये साध्य करायला मदत होईल. 
बसेसची प्रवाशी संख्या सुधारण्यासाठी, पी.एम.पी.एम.ल  ने १८ एप्रिल रोजी “बस डे” साजरा केला आणि सर्व १८५३ बसेस सेवेत उपलब्ध करून दिल्या. यामुळे रोजच्या प्रवासी संख्येत २ लाख ने वाढ (रोजची प्रवासी संख्या – सुमारे १० लाख) होणे अपेक्षित आहे. 

पी.एम.पी.एम.एल. च्या बस डे चे वृत्त

इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी (ITDP) द्वारे चालू असलेल्या सर्वेक्षणानुसार असे आढळून आले आहे की, बस डे दिवशी प्रवासी संख्येने ११ लाखांचा टप्पा ओलांडला, जो गेल्या एक महिन्याच्या सरासरी च्या तुलनेत ६% ने जास्त आहे. 

“बस केवळ लोकांना प्रवास करण्यास मदत करत नाहीत तर अर्थव्यवस्था सुधारतात, तसेच शहराला सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख देतात. बससेवा पुरविणे हा नफा कमावण्याचा व्यवसाय म्हणून न पाहता लोकांची सेवा म्हणून बघितला पाहिजे. आपल्या शहराच्या विकासासाठी पीएमपीएमएलची वाढ आवश्यक आहे.”

  • कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे म.न.पा.

प्रवाशांच्या प्रतिक्रिया

३०० बसेसची भर पडल्याने, बसेसची वारंवारिता सुधारली आणि प्रवासी वाढले. आय.टी.डी.पी. इंडिया द्वारे चालू असलेल्या सर्वेक्षणानुसार, ५१% लोकांनी बस दिनी  ५ मिनिटांपेक्षा कमी वेळात बस मिळाली. तथापि, फायदा पाहून बहुतेक लोकांनी दररोज अशी सेवा देण्यास  सांगितले. सर्वेक्षणात, बस मार्ग आणि सेवांबद्दल माहिती सहज उपलब्ध होण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.
पी.एम.पी.एम.एल च्या वर्धापन दिनी, १९ एप्रिल रोजी पुण्यदशम बसेसमध्ये मोफत प्रवास, व इतर सेवांच्या सर्व मार्गांवर किमान भाडे रु. ५  आणि कमाल रु. १० भाडे जाहीर केले होते. आय.टी.डी.पी. ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ६७% लोकांनी कमी भाडे दराचा फायदा झाल्याची प्रतिक्रिया दिली.
२० एप्रिल हा महिलांसाठी समर्पित दिन असल्याने, पी.एम.पी.एम.एल ने, महिलांसाठी रु. १० मध्ये दिवसाचा पास जाहीर केला आहे, ज्या मुळे प्रवासी संख्येत वाढ होणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading