विवेक वेलणकर, सुमेधा चिथडे यांना पुणे सार्वजनिक सभेचा पुरस्कार जाहीर

पुणे : पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने संस्थेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता अरण्येश्वर येथील सुपर्ण हॉल मध्ये पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांना सार्वजनिक काका पुरस्कार, सुमेधा चिथडे यांना रमाबाई रानडे पुरस्कार, तर शिलरत्न बंगाळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.

पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष विद्याधरपंत नारगोलकर, कार्याध्यक्ष अनिल शिदोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक अनिल शिदोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: