निर्दयतेचा कळस : आठ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून

पिंपरी : एका आठ वर्षीय मुलाचा अतिशय निर्दयपणे दगडाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार चिखली परिसरात उघडकीस आला आहे. लक्ष्मण देवासी (रा. हरगुडेवस्ती, चिखली, मुळगाव राजस्थान) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचा मृतदेह चिखली येथील एका पडक्या घरात आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपींना अटक होई पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मुलाच्या नातेवाईकांनी घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार काल (दि.17) रविवारी रात्री उघडकीस आला आहे. लक्ष्मण हा रविवारी दुपारी घरातून बाहेर गेला होतो. तो खूपवेळ घरी न आल्याने घरच्यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चिखली पोलिसांनी शोध घेतला असता लक्ष्मणचा मृतदेह चिखली येथील एका पडक्या घरात आढळून आला. प्रथमदर्शनी दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Leave a Reply

%d bloggers like this: