fbpx
Tuesday, May 14, 2024
Latest NewsPUNE

राज ठाकरे यांची बालगंधर्व येथील महाराष्ट्र माझा आंबा महोत्सवास भेट

पुणे:राज ठाकरे यांनी पुणे दौरावर असताना बालगंधर्व रंगमंदिर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सहेली बचत गट आयोजीत थेट शेतकरी ते ग्राहक महाराष्ट्र माझा आंबा महोत्सवास काल भेट दिली.
महोत्सवास आलेल्या कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी बांधवांशी त्यांनी चर्चा केली त्यांची विचारपूस केली असता शेतकऱ्यांनी मनसे गेले 13 वर्षे मराठी माणसासाठी हा उपक्रम राबवत असल्या बद्दल आभार व्यक्त केले.
सर्व स्टॉल वर भेट झाल्या नंतर आयोजक रवि सहाणे ,आरती सहाणे यांनी मा. राज ठाकरे यांना शाल ,पुष्पगुच्छ देत सत्कार केला व आंबा पेटी भेट दिली व वेळात वेळ भेट दिल्या बद्दल आभार मानले.

याप्रसंगी मनसे नेते अनिल शिदीरे, अविनाश अभ्यंकर,  हर्षल देशपांडे, किशोर शिंदे , सचिन मोरे,  प्रशांत कानोजिया, सारंग सराफ,  मंगेश जोशी,  गणेश धुमाळ , संग्राम तळेकर, देवश्री तळेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading