Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

पिंपरी चिंचवड देशातील सर्वात वेगाने विकसीत होणारे शहर : अजित गव्हाणे

पिंपरी : कोविड काळात सर्वच उद्योग, व्यवसाय आर्थिक संकटात आले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करुन उद्योग, व्यवसायांना चालना मिळण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. राज्यभरात वाढलेली विजेची मागणी हे उद्योग, व्यवसाय वेगाने वाढत असल्याचे लक्षण आहे. माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण, माजी खा. आण्णासाहेब मगर यांच्या दुरदृष्टीने स्थापन झालेली ही उद्योग नगरी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वात वेगाने विकसीत होणारे शहर म्हणून ओळखले जात आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने मोशी प्राधिकरण येथे आयोजित केलेल्या उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराच्या उद्‌घाटन प्रसंगी अजित गव्हाणे बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे पाटील, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी मदन शेळके, व्यवस्थापन तज्ञ राजेंद्र घावटे, उद्योग व व्यापार विभागाचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक विजयकुमार पिरंगुटे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक अरुण बो-हाडे, संजय वाबळे, विक्रांत लांडे तसेच संजय आहेर, विजय लोखंडे, ॲड. गोरक्ष लोखंडे, मोनिका जाधव, मनिषा भोसले, श्रीकांत कदम, ॲड. सरवदे, महेश निपाणे, विजयकुमार हिंगे, ॲड. आर. सी. कुंभार, निलेश सोळंकी, अतुल गायकवाड, उद्योजक आण्णा घुले, भिवंडी शहराध्यक्ष इरफान शेख आदी उपस्थित होते.

यावेळी मदन शेळके म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या बेरोजगार युवकांसाठी, व्यवसाय वृध्दीसाठी, अनेक कर्ज व अनुदान योजना आहेत. तसेच ‘क्लस्टर’ (समुहाने) योजने अंतर्गत नविन व्यवसाय व व्यवसाय वृध्दीसाठी देखील कर्ज व अनुदान योजना आहे. याचा बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा तसेच व्यवसायाची निवड करताना नागरीकांची गरज ओळखून ‘गरजेप्रमाणे वितरण’ हे सुत्र ओळखून व्यवसायाची निवड करावी.

व्यवस्थापन तज्ञ राजेंद्र घावटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे आदींनी मार्गदर्शन केले. स्वागत विजयकुमार पिरंगुटे, सुत्रसंचालन माधव पाटील आणि आभार अशोक मोरे यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading