राज ठाकरे यांच्या हस्ते रक्तदान क्षेत्रात कार्य करणाऱ्याचा भाऊसाहेब खिलारे पुरस्काराने सन्मान


पुणे : रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल पी एस आय ब्लडबँकेचे संचालक श्री संजय चौधरी व अक्षय ब्लडबँकेचे संचालक संजयकुमार शिंदे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते दिवंगत माजी महापौर कै.  भाऊसाहेब खिलारे समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले मनसे व राम बोरकर मित्र परिवातातर्फे रविवारी सकाळी दिवंगत सामाजिक कार्यकर्ते कै शिरीष तुपे यांच्या समरणार्थ रक्तदान शिबिर एरंडवणा येथे मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले होते शिबिराचे हे 29 वे वर्ष आहे या शिबिरात 190 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केले. 

या रक्तदान शिबिराचे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री चौधरी व श्री शिंदे यांचा कै भाऊसाहेब खिलारे समाजभूषण पुरस्कार देऊन खास सन्मान करण्यात आला सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे
तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून नवोदित कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल शाहीर हेमंत मावळे, संजय कुलकर्णी, राजीव बोडस, संजय चोरडिया, जयंत देवरे, समीर एनपुरे, आदी 12 सन्मानीय व्यक्तींचा राज ठाकरे यांच्या हस्ते दिवंगत महापौर कै भाऊसाहेब खिलारे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
या कार्यक्रमात राम बोरकर मित्र परिवाराचे प्रमुख व मनसे नेते राम बोरकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले या शिबिरात राजेश शिगवण, गणेश शेडगे, रोहित सातपुते, उदय गडकरी, चंदन सागवेकर, सुभाष एनपुरे,नागेश जगताप,दत्तात्रय बिराजदार, प्रथमेश सागवेकर, व योगेश सुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

%d bloggers like this: