अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग 2022 स्पर्धेत 10 संघ सहभागी 

पुणे: डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित रावतेकर ग्रुप पुरस्कृत अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग 2022 स्पर्धेत 10 संघानी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा दि.19 ते 23 एप्रिल  2022 या कालावधीत डेक्कन जिमखानाच्या मैदानावर होणार आहे. ही स्पर्धा कॉरोनचे सर्व नियम पाळून आयोजित करण्यात आली आहे.

डेक्कन जिमखानाच्या वित्तीय विभागाचे सचिव मिहीर केळकर यांनी सांगितले की, या स्पर्धेत 10 संघ सहभागी झाले आहेत. एकूण 200 खेळाडूंच्या सहभागातून घेण्यात आलेल्या लिलावात ओंकार पाटील(रोहन स्ट्रायकर्स, 5800पॉईंट्स) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.  या शिवाय नंदन कामत(5700पॉईंट्स, एअँडए शार्क्स), सचिन गोडबोले(स्नोलेपर्डस), विमल हंसराज(मराठा वॉरियर्स) यांचा समावेश आहे.

विविध क्रिडाप्रकारांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी डेक्कन जिमखाना क्लब नेहमीच आघाडीवर असतो. या स्पर्धेला रावेतकर ग्रुप प्रायोजकत्व लाभले आहे. तसेच, कोटक बँक व पुनीत बालन ग्रुप यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेत सिटी प्राईड सुपर स्टार्स, वाडेश्वर विझार्डस, रोहन स्ट्रायकर्स, हॅ-ट्रिक्स, ए अँड ए शार्क्स, मराठा वॉरियर्स, ऍक्वा रायडर्स, स्नो लेपर्डस, टीटी टायटन्स, आयकॉन टायगर्स हे दहा संघ झुंजणार आहेत. स्पर्धेसाठी क्रिकेट टेनिस बॉलचे सर्व नियम लागू असून सर्व सामने सायंकाळी 4.00 ते रात्री 10.00 या वेळेत होणार असून काही सामने विद्युताप्रकाश झोतात होणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना दि. 23  एप्रिल 2022 या दिवशी होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये विश्वेश कट्क्कर, मिहीर केळकर, मृगांक राठी, केदार जोगळेकर यांचा समावेश आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: