कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मतांनी विजयी होतील – जयंत पाटील

पुणे:कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून काँग्रेसच्या उमेदवार मोठ्या मतांनी विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
आग राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रा पुण्यात आली आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला
जयंत पाटील म्हणाले महाविकास आघाडीच्या सर्वांनी चांगले काम कोल्हापूर मध्ये केले आहे. त्यामुळे नक्कीच आमचा विजय होईल असे जयंत पाटील म्हणाले.
मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापलेले आहे. त्यात आज हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादीकडून पुण्यात हनुमानाच्या आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदापमंत्री जयंत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी आम्हीही हनुमान, रामाचे भक्त असून फक्त त्याचे प्रदर्शन करत नाही असे म्हणाले.
एकीकडे मनसे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमानाची आरती करणार असल्याबाबत प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले की, याला सर्वधर्मसमभाव म्हणतात. सगळ्यांचा सन्मान ठेवण्याची आणि सर्वांना समानतेने वागवण्याची ही पद्धत आहे.
जयंत पाटील म्हणाले, म्हणाले सध्या जाणीवपूर्वक महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. एका बाजूने राज ठाकरे आग्रह करणार आणि थोड्या दिवसाने औवैसी पिक्चरमध्ये येणार. राज्यात जातीव तणाव निर्माण करण्याचा आणि अघटीत घडवण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राला हळूहळू ते दिसेलच.
पेट्रोल-डिझेल, गॅस, स्टील, सिमेंट महाग झाले आहे याची चर्चा सध्या होत नाही, पण हनुमान चालिसाची चर्चा होतेय. आम्हीही हनुमानाचे, प्रभू श्रीरामाचे भक्त आहोत, पण त्याचे प्रदर्शन करत नाही. जाणीवपूर्वक देवांना वापरणे हे आम्ही कधी केले नाही, असे म्हणत सध्या देवांचा राजकारणासाठी वापर सुरू असल्याचा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.

Leave a Reply

%d bloggers like this: