भोंग्याचे राजकारण करायचय तर करा; पण आम्हाला रात्रीची वीज दिवसा द्या – राजू शेट्टी

पुणे : मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापलेले आहे. त्यात आज हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादीकडून पुण्यात हनुमानाच्या आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावर “भोंग्याचे राजकारण काय करायचे ते करा, पण आम्हाला रात्रीची वीज दिवसा द्या, अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मांडली.

पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला प्रकाशतात्या बालवडकर, बापुसाहेब कारंडे उपस्थित होते.

शेतकऱ्यांना योग्य प्रकारे भाव मिळत नसल्याची भावना वक्त  करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे महाविकास आघाडी मधून बाहेर पडले आज कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून त्यावर प्रतिकीया देताना राजू शेट्टी म्हणाले, कोल्हापूर पोटनिवडणुकीत आम्ही भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे कोण जिंकलं हारल याने आम्हाला फरक पडत नाही. दोन्ही आघाड्यानी प्रचाराची खालची पातळी गाठली आहे, अशी टिका राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी व भाजपवर केली.

महाविकास आघाडी कोल्हापूर मध्ये जिंकत आहे असे दिसत आहे. त्यावर राजू शेट्टी म्हणाले ,एका निवडणूकीतून महाविकास आघाडीचा निष्कर्ष काढता येणार नाही. निवडणूक म्हटलं की कोणी जिंकत असतं कोणी हारत असतं हामतदारसंघ हा शहरी होता ग्रामीण भागात काय कौल आहे हे बघावं लागेल. असे राजू शेट्टी म्हणाले.

राज्यात कोळशाचे संकट हे जाणवत आहे .त्यावर राजू शेट्टी म्हणाले, भारनियमनाचा सर्वाधिक फटका शेतीला. विजेचे वाटप करताना पक्षपात. इतरांना २४ तास वीज. शेतकऱ्यांना आठ तास रात्रीची वीज दिली जाते. आता त्यात ही कपात केलीये तीन तास वीज दिली जातेय. शेतकऱ्यांना वीज देत नसाल तर बिल का द्यावे लागते, असा सवाल राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला विचारला.

 

Leave a Reply

%d bloggers like this: