संभाजी ब्रिगेड मावळ तालुका अध्यक्षपदी उमेश मांढरे यांची निवड

पुणे : संभाजी ब्रिगेड पक्षाच्या मावळ तालुका अध्यक्ष पदी उमेश मांढरे यांची निवड करण्यात आली मयूर शितोळे यांच्या जागेवर उमेश मांढरे यांची निवड करण्यात आली संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी उमेश मांढरे यांना निवडीचे पत्र दिले,

मावळ तालुक्यात जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेडचे संघटन वाढवणार आहे व संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे,कामगारांचे,महिलांचे,रिक्षावाल्यांचे प्रश्न सोडवणार आहे असे तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर उमेश मांढरे यांनी सांगितले, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले तसेच येणाऱ्या काळातील निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार आहे अशी घोषणा केली, यावेळी सोशल मिडिया जिल्हा उपाध्यक्ष अशोक फाजगे, वाहतूक आघाडी उपाध्यक्ष विजय कदम, प्रकाश पारखे, माथडी कामगार कार्यकारणी सदस्य आबासाहेब मांढरे, नाथा जाधव, दीपक चव्हाण, श्रीकांत लाखवडे, नवनाथजाधव, सोनू  कांबळे, रोशन पवार, संतोष भाऊ चोपडे, रुपेश वाघेरे, उत्तम चंद्रराव मांढरे महाराज, कैलास आढागळे, शशिकांत खुडे, किरण चव्हाण, गणेश मांढरे, यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: