पहा photos : रणबीर आणि आलिया अडकले लग्न बंधनात; लग्नानंतर आलियाची इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट
मुंबई : आज अभिनेता रणबीर कपूर – आलिया भट्ट हे मुंबईत विवाहबंधनात अडकले. जवळचे नातेवाईक आणि मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. रणबीरच्या ‘वास्तू’ या निवासस्थानी हा लग्नसोहळा पार पडला. मात्र माध्यमांमध्ये या लग्न सोहळ्याचे फोटो आले नाहीत. अखेर आता लग्नानंतर आलियाने आपल्या इंस्टाग्रामवर भावनीक पोस्ट शेयर करीत लग्नाचे काही क्षण चंहत्यांसोबत शेयर केले आहेत. रणबीर आणि आलियानं पंजाबी विवाहपद्धतीनुसार लग्न केले आहे.

आलियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आमचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या साक्षीने आज आम्ही आमच्या आवडत्या जागी, ज्याठिकाणी आम्ही आमच्या रिलेशनशिपची पाच वर्षे व्यतीत केली, त्या बाल्कनीमध्ये लग्नगाठ बांधली. अनेक आठवणी एकमेकांसोबत विणण्यासाठी आम्ही दोघं उत्सुक आहोत. आठवणी ज्या प्रेमाने, हास्याने, आनंदाने, मूव्ही नाईट्सने, छोट्यामोठ्या भांडणांनी, वाईन्सने, चायनीचने आणि शांततेने परिपूर्ण असतील. आमच्या आयुष्यातील या अत्यंत महत्वाच्या काळात दिलेल्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.’

2018 मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त रणबीर-आलिया एकत्र आले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. पाच वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. रणबीर आणि आलिया हे 2020 मध्येच लग्न करणार होते. मात्र रणबीरचे वडील ऋषी कपूर यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी लग्न पुढे ढकललं.

दरम्यानच्या दोन वर्षांच्या काळात ऋषी कपूर यांचं कर्करोगाने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी आलिया आणि रणबीरने लग्न केलं. आजच्या दिवशी चिंटूची (ऋषी कपूर) खूप आठवण येतेय, अशी भावना रणधीर कपूर यांनी आज व्यक्त केली.

लग्नानंतर रणबीर आणि आलिया यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी मुंबईतीतल बंगल्याबाहेर गर्दी केली होती. लग्नसोहळा पार पडल्यानंतर आलिया आणि रणबीरनं चाहत्यांच्या शुभेच्छाही स्वीकारल्यात. तसंच नवविवाहीत दाम्पत्यानं यावेळी माध्यमाच्या कॅमेऱ्यांसमोर एकत्र पोझही दिली.

फोटोसेशन झाल्यानंतर रणबीर कपूरनं आलीयाला उचलून घेतलं आणि तसाच रणबीर पुन्हा आतमध्ये जाण्यासाठी निघाला. यावेळी आलियाच्या आणि रणबीरच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.

