राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमान जयंतीला महाआरती

पुणे: मशिदीवरील भोंगे न काढल्यास त्याच्यासमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. यावरून आरोप प्रत्यारोप सुरू अजूनही आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे शनिवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे परत राजकीय वातावरण तापते का हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

सालाबाद प्रमाणे याही वर्षी खालकर चौक मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्सव साजरा होणार आहे .या उत्सवास राज  ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तसेच त्यांचा उल्लेख हिदुंजननायक आदरणीय असा करण्यात आला आहे. गेली दीड शतक खालकर मारुती मंदिर हे भविकांचे श्रद्धा स्थान राहिले आहे . हे मंदिर जून झाल्या मुळे आणि एका अपघातात मंदिरा ची भिंत पडल्या मुळे २० वर्षा पूर्वी मंदिराच्या बांधकामा ची सुरवात  राज ठाकरे यांच्या हस्ते झाली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: