बहुजन समाज पार्टी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


पुणे:बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा पुणे शहराच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा. हुलगेश चलवादी,प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड, प्रदेश सचिव भाऊसाहेब शिंदे, जिल्हा प्रभारी रमेश गायकवाड, जिल्हा प्रभारी संजय शेंडगे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा निधी वैद्य पुणे जिल्हा सचिव मोहम्मद शफी,पुणे शहर प्रभारी अरुण गायकवाड, पुणे शहर महासचिव सागर खंडे, पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखाताई कांबळे वरिष्ठ नेत्या शितलताई गायकवाड, हडपसर विधानसभा अध्यक्ष राजेंद्र राऊत, गजेंद्र आल्हाट हसमुख सिंह जुनी, आनंद सोनवणे, कैलास ओव्हाळ, सनी तेलंग व इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी हुलगेश चलवादी म्हणाले बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर ३६५ दिवस बसपा कार्य करते‌ व बहुजन समाजाला शासनकर्ती जमात बनविण्यासाठी व संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी बसपा कटिबद्ध आहे. पुणे जिल्हा सचिव मोहम्मद शफी म्हणाले संविधानामुळे आज सर्वच समाज सुरक्षित आहे परंतु संघटित नसल्याने अन्याय अत्याचार वाढत आहे. अल्पसंख्याक समाजाने बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणार्या बसपा सोबत यावे अन्याय अत्याचार तुन मुक्ती मिळेल. सर्वजन हिताय व सर्वजन सुखाय हा बसपाचा नारा आहे महमंद शफी यांनी विचार व्यक्त केले. मोठ्या संख्येने महिला व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: