मनसे-भाजप युती : प्रस्ताव आला की त्यावर विचार केला जाईल- चंद्रकांत पाटील

पुणे:राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत मनसे-भाजप येणाऱ्या निवडणुकीत युती होऊ शकते असे संकेत दिले होते त्यावर राज्यात परत भाजप मनसे युतीची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर असा कुठलाही प्रस्ताव नाही. आमची 13 जणांची टीम आहे. असा प्रस्ताव आला की त्यावर विचार विनिमय होऊन निर्णय घेतला जाईल. असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बातचीत करताना म्हणाले.

आज पुण्यात चंद्रकांत पाटील हे डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता आले असता त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली.
राज ठाकरे यांनी परवा एका जाहीर सभेत शरद पवार यांनी जातीयवाद पसरवल्यचा असा आरोप शरद पवार यांच्यावर केला होता तसेच पवार नास्तिक असल्याचेही म्हटले होते.
शरद पवार कोणत्याही देवाला मानत नाही, त्याचा एक फोटोही देवाला हात जोडलेला सपडणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर राज ठाकरे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते कुणाची बी टीम म्हणून काम करत नाहीत. कुणाच्या सांगण्यावरून ते बोलत नाहीत. त्यांना जी मत मांडायची ती ते परखडपणे मांडतात. त्यांनी पंतप्रधान मोदी तसेच भाजप विरोधातही मत मांडलेली आहेत. महविकास आघाडी आणि पवारांचं असं आहे की त्यांना बरं म्हटलं की बरं असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
आय एन एस विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टात किरीट सोमय्या यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,त्यांना न्याय दिला की न्याय, कोर्टाने किरीट सोमय्या ना न्याय दिला की काहीतरी गडबड हे बरोबर नाही. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: