डॉ. आंबेडकर जयंती दिनी आझम कॅम्पसचा अभिवादन कार्यक्रम

पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संस्थेच्या नियामक मंडळाच्या सर्व सदस्यांनी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार यांच्या मार्गदर्शनखाली १४ एप्रील रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले .

डॉ. पी.ए.इनामदार ,संस्थेचे सचिव प्रा .इरफान शेख ,एस ए इनामदार ,डॉ नाझीम शेख ,महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी ,हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट ,गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट,महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन एंड रिसर्च सेंटर तसेच अवामी महाज सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि प्राचार्य ,प्राध्यापक ,कर्मचारी ,विद्यार्थी सहभागी झाले.

दरवर्षी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. हजारो विद्यार्थी त्यात सहभागी होतात.त्यातून महामानवांचे सामाजिक ,शैक्षणिक संदेश प्रसारित केले जातात.

Leave a Reply

%d bloggers like this: