मुख्यमंत्री साहेब महापालिकेकडून प्रभाग रचना करून घेऊ नका – विरोधी पक्षनेते उज्वल केसकर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या प्रभागांची रचना महापालिकेच्याच प्रशासनाकडून करून घेऊ नका , त्रयस्थ यंत्रणा त्यासाठी राबवा हवे तर संचालक नगर रचना यांच्याकडे हे काम सोपवा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.महापालिकेचे प्रशासन हे व्यक्ती आणि काही पक्ष यांच्या दबावाखाली असल्याचा ठपका या साठी त्यांनी ठेवला आहे.

या संदर्भात मागणी करताना केसकर म्हणाले आहे की ,महानगरपालिकेने प्रभाग रचना करताना एक विशिष्ट पक्ष डोळ्यासमोर ठेवून 11 प्रभाग 55 हजार लोकसंख्येचे तर बाकीचे 68 हजार ते लोकसंख्येचे केले होते त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडे प्रभाग रचना करण्यासाठी देण्याची चूक आपण करू नका. विशिष्ट व्यक्ति आणि पक्ष यांच्या दबावाखाली प्रशासन आहे त्यामुळे प्रभाग रचना करायला देण्यासाठी स्वायत्त अशा यंत्रणेच्या मार्फत केली पाहिजे, असे आम्हाला वाटते. पुन्हा महानगरपालिका करणार असेल तर मागची रचना ते करतील एका विशिष्ट व्यक्तीसाठी नियम सोडून दोन चा प्रभाग केला होता आता पुन्हा तसेच करतील ही आम्हाला शंका आहे. त्यामुळे आपण याबाबत संचालक नगर रचना यांच्याकडे हे काम सोपवावे असे वाटते.

Leave a Reply

%d bloggers like this: