fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

मोदी सरकारमुळे कोरोना प्रसाराला अटकाव भाजपा चे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांची माहिती

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ​कोरोना प्रसाराला अटकाव करण्यासाठी वेगाने निर्णय घेतल्यामुळे या संकटाशी देश प्रभावीपणे सामना करू शकला असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्या ४२व्या स्थापना दिनानिमित्त मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोनावर स्वतःची लस तयार करण्यात यश मिळवून विक्रमी वेगाने लसीकरण करून मोदी सरकारने कार्यक्षम कारभाराचा आदर्श घालून दिल्याचेही मुळीक यांनी सांगितले.

मुळीक यांनी सांगितले की कोरोनावरील स्वतःची लस तयार करणाऱ्या, मोजक्या देशात भारताचा समावेश झाला आहे. कोरोनाचा प्रसार वेगाने होत असताना मोदी सरकारने देशातच लस तयार व्हावी यासाठी वेगाने निर्णय घेतले परिणामी अनेक देशांच्या तुलनेत भारताची लस कमीत कमी कालावधीत तयार झाली. त्याबरोबरच कोरोनावरील उपचारासाठी गाव पातळीपर्यंत प्रभावी वैद्यकीय उपचार यंत्रणा निर्माण करण्यासाठी मोदी सरकारने दूरदृष्टीने अनेक निर्णय घेतले. परिणामी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड यासारख्या सुविधा गाव पातळीपर्यंत जलद गतीने तयार होण्यास मदत झाली. देशाची मोठी लोकसंख्या लक्षात घेऊन १६ जानेवारी २०२१ रोजी देशव्यापी लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. २२ ऑकटोबर २०२१ रोजी १०० कोटी नागरिकांचे लसीकरण विक्रमी वेळेत पूर्ण झाले.

७ जून २०२१ रोजी मोदी सरकारने सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला. देशाची लोकसंख्या लक्षात घेऊन लसीचे उत्पादन वेगाने व्हावे यासाठीही मोदी सरकारने वेळेत निर्णय घेतले. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात मोफत लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद मोदी सरकारने केली. ११ एप्रिल २२ पर्यंत १८५.७४ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. १२ ते १४ वयोगटात २.२२ कोटी एवढे लसीकरण झाले आहे. राज्य सरकारांना ४ लाख २ हजारा हून अधिक ऑक्सिजन सिलेंडरचे व १ लाख १३ हजर ८५८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading