Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

2022-23 हे नवीन शैक्षणिक वर्ष 13 जून पासून सुरू होणार

मुंबई : 2022-23 हे आगामी शैक्षणिक वर्ष  13 जून पासून सुरू होणार आहे. तर उन्हाळी सुट्टी ही 2 मे पासून सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्यशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबदचे अधिकृत पत्रक आज शिक्षण विभागांच्यावतीने जारी करण्यात आले आहे. दरम्यान, जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. २७ जून, २०२२ रोजी सुरू होतील.

या निर्णयानुसार सोमवार दि. ०२ मे, २०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येणार आहे. सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. १२ जून, २०२२ पर्यंत ग्राह्य धरण्यात येऊन सन २०२२-२३ मध्ये पुढील शैक्षणिक वर्षात दुसरा सोमवार दि. १३ जून, २०२२ रोजी शाळा सुरू करण्यात येतील.

इयत्ता पहिली ते नववी व ११ वी चा निकाल दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल. तथापि तो निकाल विद्यार्थी किंवा पालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची असणार आहे.

दरवर्षी सर्व शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी सुरू होणार  

आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) जी तारीख असेल त्या तारखेपासून शाळा सुरू होतील, असेही या परिपत्रकान्वये स्पष्ट करण्यात आले आहे.

फोटो- संग्रही

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading