उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांचा ‘तिरसाट’ सिनेमाच्या टीम कडून सन्मान
मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या वेगवेगळे नवीन प्रयोग होताना दिसत आहेत. दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांच्या “तिरसाट” सिनेमातील ‘वरात स्पेशालिस्ट’ गाण्याचे श्री शंकर महाराज मठ येथे नुकतेच उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी संदीप बधे यांच्या हस्ते उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांचा सन्मान करण्यात आला. शिवसेना नेते बळीराम निंबाळकर, अकलूज भागातील नेते अशोकभाऊ एकतपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर कलाकार नीरज पवार, तेजस्विनी शिर्के यावेळी उपस्थित होते. येत्या 13 मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
