तीव्र उष्णतेमुळे शाळांची वेळ सरसकट सकाळी 7 ते 11 करावी

छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची मागणी

पिंपरी : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आली असल्याने शाळा सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू ठेवाव्यात, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने अनेक शाळांचे अभ्यासक्रम पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे एप्रिल महिन्यात शाळा सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्याया सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी तीव्र उष्णतेमुळे चक्कर येऊन पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही तीव्र उष्णता विद्यार्थ्यांच्या जीवावरही बेतू शकते. 

अनेक पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. भर उन्हाळ्यात शाळेची वेळ जास्त ठेवण्यात आल्याने पालक व विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. उन्हामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाल्यास शाळा जबाबदारी घेणार का ? कोणत्याही शाळेचे प्रशासन अशी जबाबदारी उचलायला तयार होणार नाही. शासन स्तरावरूनच शाळांच्या वेळेबाबत योग्य निर्णय होणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर शाळांना निर्णय घेण्यास सांगितल्यास कोणतेच शाळा प्रशासन वेळ कमी करण्यास धजावणार नाही. त्यामुळे शाळांच्या वेळा सरसकट सकाळी 11 वाजेपर्यंत कराव्यात, असेही रामभाऊ जाधव सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: