‘मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र’ सौंदर्य स्पर्धेचे तिसरे पर्व उत्साहात संपन्न..

पुणे :  विविध वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणजेच ‘मेडिक्वीन मेडिको मिसेस महाराष्ट्र’ या सौंदर्य स्पर्धा. या स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पुण्यात पार पडली. नवी मुंबई येथील डॉ.राधिका विश्वेश्वर रॉयल गटातून तर ठाण्यातील डॉ. मेधा भावे क्लासिक गटातून विजेत्या झाल्या. महाराष्ट्रातील विविध भागातून सुमारे 2०० महिला डॉक्टरांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यातून ५५ स्पर्धक शेवटच्या फेरीमध्ये पोहोचले. या स्पर्धकांमधून रॉयल गटातून ५ विजेते आणि क्लासिक गटातून ३ विजेते घोषित करण्यात आले.

ॲलोपॅथी, आयुर्वेद, डेंटल, होमिओपॅथी, फिजिओथेरपी क्षेत्रातील सर्व महिला डॉक्टरांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन मेडिक्वीन मेडिको पेजंटच्या कार्यकारी अध्यक्षा डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर आणि सचिव डॉ. प्राजक्ता शहा यांच्याकडून दरवर्षी करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेचे तिसरे पर्व आहे.

योगेश पवार यांनी कोरीओग्राफर म्हणून काम पाहिले. कशिश प्रॉडक्शन कंपनीने व्यवस्थापकीय काम पाहिले. या स्पर्धेसाठी प्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी, शितल रांका, डॉ. रेवती राणे,  डॉ. ऊज्वला बर्दापूरकर, डॉ. श्रद्धा जावंजल, डॉ. अमोल गिते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच अभिनेत्री पूजा सावंत, सुशांत शेलार, डॉ. ऊत्कर्ष शिंदे,  तेजपाल वाघ आदींची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

सुनेत्राताई पवार यांनी या स्पर्धेला पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या, हि केवळ एक सौंदर्य स्पर्धा नसून यामध्ये सहभागी डॉक्टर्सच्या सामाजिक, वैद्यकीय, कला, छंद, सांस्कृतिक क्षेत्रातिल कार्य तसेच उत्तम डॉक्टर्सना प्रकाशात आणणारी ही एक उत्कृष्ठ चळवळ आहे. “महिला आरोग्य –निरामया” अर्थात प्रत्येक स्त्री आरोग्यपूर्ण हे बोधवाक्य स्वत:चे अंतिम ध्येय ठरवून ज्या महिला डॉक्टर आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीला आरोग्याचे वरदान देण्यासाठी, तसेच तिच्यावर आरोग्य जपण्याचे संस्कार करण्यासाठी अहोरात्र झटतात, त्यांच्या सर्वंकष कार्याला सलाम करणारी ही स्पर्धा म्हणजेच या भारतमातेच्या तनुवर आरोग्याचा अलंकार अर्पण करणाऱ्या सौन्दर्य व श्रद्धावंतांची निरामय वारी आहे, असे सुनेत्राताई पत्राद्वारे म्हणाल्या.

विजेते.

रॉयल ग्रुप्स विजेते

विजेत्या – डॉ.राधिका विश्वेश्वर, नवी मुंबई

उपविजेत्या: डॉ. रिशिका तावरी-अटल, नागपूर

दुसरा क्रमांक : डॉ. स्मिता काळे, मुंबई

तिसरा क्रमांक : डॉ.शिल्पा फाडे, अकलूज

डॉ. पल्लवी उत्तेकर, ठाणे

क्लासिक विजेते

पहिला क्रमांक : डॉ. मेधा भावे, ठाणे

दुसरा क्रमांक : डॉ. विद्या रवी, ठाणे

तिसरा क्रमांक :डॉ. मीनल देशमुख, अमरावती

सामाजिक कार्य विजेत्या

डॉ. प्रीती अहिरे, पुणे

Leave a Reply

%d bloggers like this: