राज ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी वसंत मोरे यांनी साधला कार्यकर्त्यांची संवाद

पुणे : वसंत मोरे हे उद्या मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मनसेचे नेते बाबू वागस्कर हे राज ठाकरे यांचा निरोप घेऊन वसंत मोरे यांच्या घरी गेले आहेत. त्यांनी वसंत मोरे यांना राज ठाकरे यांचा निरोप दिला. राज ठाकरे यांनी सोमवारी तुम्हाला भेटायला बोलावले असल्याचे बाबू वागस्कर यांनी सांगितले. त्यामुळे आता सोमवारी शिवतीर्थवरील बैठकीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

दरम्यान राज ठाकरे यांच्या भेटीपूर्वी वसंत मोरे हे कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असून नंतरच पुढील राजकीय दिशा ठरवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे वसंत मोरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याच्या आवाजा विरोधात भूमिका घेतली, आणि त्या भोंग्याचा आवाजाच्या दुपटीने हनुमान चालीसा लावावी असे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले त्यानंतर राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेच्या अगदी विरोधी भूमिका घेतली. “माझ्या प्रभागात मी अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचे भोंगे लावणार नाही.” अशी थेट भूमिका घेतल्यामुळे वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आलीय.

त्यानंतर वसंत मोरे हे मनसेत राहणार की पक्षबदल करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच वसंत मोरे आज आपल्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत. आता ही भेट नक्की कशासाठी आहे? असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. कारण नुकतंच वसंत मोरे यांनी आपण कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय कोणताच निर्णय घेत नाहीत असं स्पष्ट केलं होत. त्यामुळे आज कार्यकर्त्यांना भेटून मोरे आपल्या पुढील राजकारणाची दिशा ठरवणार आहेत .

Leave a Reply

%d bloggers like this: