लोकशिक्षण आणि बौद्ध धम्म प्रसारात सम्राट अशोक यांची भूमिका मोलाची – प्रा. विश्वास वसेकर

पुणेः- सम्राट अशोक हे विश्वविख्यात सम्राट होते. मौर्य साम्राज्याचे तिसरे राजे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. राज्य मिळवण्यासाठी आणि मिळालेले राज्य टिकवण्यासाठी भ्रातृ कलहापासून अनेक हिंसक युद्धांना सम्राट अशोक सामोरे गेले. परंतु, या माध्यमातून झालेल्या हिंसेचा पश्चाताप होऊन त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारत लोक शिक्षण आणि बौद्ध धम्म प्रसारात  मोलाची भूमिका बजावली, असे मत ज्येष्ठ साहित्यीक आणि समीक्षक प्रा. विश्वास वसेकर यांनी व्यक्त केले. 

फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचातर्फे देण्यात येणा-या सम्राट अशोक पुरस्काराने आज सम्राट अशोक यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रचार-प्रसार करणारे डाॅ.अमोल देवळेकर यांना प्रा. विश्वास वसेकर यांच्या हस्ते गाैरविण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बौद्ध धम्माचे अभ्यासक झेन मास्टर सुदरसन, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड, कार्यक्रमाच्या संयोजिका प्रेरणा गायकवाड, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अॅड.प्रमोद आडकर, सम्राट अशोक पुरस्काराविरण सोहळ्याच्या स्वागताध्यक्षा आणि पुणे मनपाच्या नगरसेविका लता राजगुरु आणि सम्राट अशोक पुरस्काराविरण सोहळ्याचे निमंत्रक  कुणाल राजगुरु उपस्थित होते. 

विश्वास वसेकर त्यांच्या मनोगतात म्हणाले, बौद्ध धर्म स्विकारण्यापूर्वी सम्राट अशोक यांची प्रतिमा अतिशय नकारात्मक होती. परंतु, झालेल्या हिंसेचा पश्चाताप करीत सम्राट अशोक बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले आणि सद्गुणी अशोक सम्राट म्हणून ओळखले गेले. त्यांच्या कार्यकाळात सम्राट अशोक यांनी भारतीय एकीकरणाच्या प्रक्रीयेला गती दिली. त्यांचे कार्य एवढे उल्लेखनीय झाले की, त्यांच्या नावाची मोहोर आज राष्ट्रध्वजावर स्वीकारली गेली आहे. 

अॅड.प्रमोद आडकर यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कारार्थी  डाॅ.अमोल देवळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले,  तर लता राजगुरू यांनी आभार मानले. 

Leave a Reply

%d bloggers like this: