महापालिका निवडणुकीत ओबीसींना जागा मिळायला हव्यात यासाठी सरकार  प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : बहुतेक महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद यांच्या मुदती संपल्याने तिथे प्रशासक आलेत. ओबीसी आरक्षणासाठी निवडणुका पुढे गेल्यात. ओबीसींनासुद्धा जागा मिळायला हव्यात म्हणून आमचे सरकार  प्रयत्नशील आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  शनिवारी दिली.

वारजे माळवाडी येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते स्वर्गीय सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे जलकुंभाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते जाहीर सभेत बोलत होते.
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. त्यावर अजित पवार म्हणाले, की मला कळत नाही, कोर्टाचा निकाल लागल्यानंतर गुलाल उधळला, पेढे वाटले मग कोणाच्या सांगण्यावरून हे घडले? हे घडले तेव्हा पोलीस यंत्रणा काय करत होती, मीडियाला माहीत होते, मग पोलीस काय करत होते? याची चौकशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करायला सांगितली आहे. जाणीवपूर्वक हे वातावरण तयार केले गेले.असेही ते म्हणाले.

शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव केवळ भाषणात घेऊन उपयोग नाही तर त्यांचे विचार कृतीत आणला पाहिजे. यावेळी त्यांनी भावनिक मुद्द्यांवरून राजकारण करणाऱ्यांवरही टीका केली. लोकांना भावनिक बनवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. हा प्रकार आपल्या महाराष्ट्राला परवडणारा नाही. आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे, ही आपली शिकवण, परंपरा आहे. काम करताना चुकले तर समजावून सांगितले पाहिजे. असे ते म्हणाले.
अजित पवारांनी हिंजवडी उड्डाणपूल जेव्हा उद्घाटन करायचे होते तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ही बिघडलेली होती त्यामुळे मी संबंधित विभागाला काम सुरू करण्याच्या आदेश दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत बिघडली असल्यामुळे मला त्या भूमिपूजन ला जाऊ नये असे वाटले.
काही पक्षाचे नेते मंडळी ही भूमिपूजन केल्याशिवाय काम सुरू करत नाही. पण आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे. त्यामुळे आम्ही भूमिपूजन न सुद्धा करता काम सुरू करत आहोत .असे अजित पवार म्हणाले
मी आमदार रमेश वांजळे यांच्या सुनेचे हार्दिक अभिनंदन करत आहे त्यांनी वडील गेल्यानंतर ही आपल्या प्रभागात आपले काम सुरू केले. आज त्यांच्या प्रभागातील जलकुंभचे  उदघाटना त्यांच्या आर्थिक प्रयत्नामुळे होत आहे असे अजित पवार म्हणाले.
महानगरपालिका निवडणुका जरी कुठे गेल्या असल्या तरी एका एका प्रभागात सात-सात आठ-आठ ताकदीचे कार्यकर्ते आहेत. त्यातल्या तिघांनाच मला तिकीट देता येणार आहे. तेव्हा बाकीच्यांनी हट्ट धरू नये. आम्हालाही समजून घ्यावे. निवडणुका लागतील तेव्हा लागतील. तुम्ही काम करत राहा. असे अजित पवार म्हणाले.
मुळा-मुठा नदीच पुनरुज्जीवन व्हायला हवे. पण यावर पर्यावरणवादी क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलेत. त्याचा विचार करावाच लागणार आहे, असे ते म्हणाले. तर बरेच पक्ष भूमिपूजन करून राजकीय फायदा घेण्याच काम करत असतात. मलादेखील काही अधिकारी म्हणतात, दादा आपण भूमिपूजन करून घेऊ. मला स्वतःला हे पटत नाही, असे पवार यावेळी म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: