एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्यात आली. त्यामागच्या मास्टर माईंडचा पोलीसानी शोध घ्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे:काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार  यांच्या मुंबईमधील निवासस्थानी बाहेर संपकरी एसटी कामगारांनी गोंधळ घातला आहे. एसटी कामगारांनी  शरद पवार यांच्या सिल्वर ओक  निवासस्थानी घुसून चप्पल फेक देखील केली आहे. त्यामुळे हा एसटी कामगारांचा  वाद आता थेट शरद पवार यांच्या घरापर्यंत पोचला आहे. ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक सुद्धा झाली आहे.त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
त्यावर पोलीस विभाग त्यांचं काम करतील.  अनेक वर्षं ते काम करतायत. एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्यात आली. त्यामागे कोण मास्टर माईंड आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा.अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केली.

अजित पवार म्हणाले ,काल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकार्यांसोबत बैठक घेतलीय. 
काल शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला त्यावर अजित पवार म्हणाले, मला आश्चर्य वाटत की दोन दिवसांपूर्वी आंदोलन यशस्वी झालं म्हणून गुलाल उधळण्यात आला. मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा काय उद्देश होता. असा सवालही त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडे उपस्थित केला.
अजित पवार यांनी पोलिसांपुढे पण प्रश्न उपस्थित केला अजित पवार म्हणाले, हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे.  तुम्हाला हे आधी का कळलं नाही. असे अजित पवार म्हणाले.
तीथं जाणारे लोक मिडीयाला घेऊन पोहचले. अर्थात मिडीयाचे हे कामच आहे की जे आहे ते दाखवणं.  मग मिडीयाला जे कळलं ते पोलीस यंत्रणेला का कळलं नाही. असा सवालही अजित पवार यांनी पोलीसा पुढे उपस्थित केला.
अजित पवार म्हणाले आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आम्ही अनेकदा बैठक घेतल्या. पण नंतर ती लोकं संघटनांच देखील एकेनाशी झाली. त्यांनी तारतम्य सोडलं, जी भाषा वापरण्यात आली ती आपल्या संस्कृतीत बसत नाही.  तुम्हालाही ती भाषा आवडणार नाही  असे अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: