मिवीने साऊंडबार्सची फोर्ट सिरीज लाँच केली

मुंबई : मिवी हा आघाडीचा स्वदेशी इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्ड आता भारतामध्ये निर्माण करण्यात आलेले भारतातील पहिले साऊंडबार्स फोर्ट एस६० व फोर्ट एस१०० च्या लाँचसह होम ऑडिओ विभागामध्ये धुमाकूळ निर्माण करण्यास सज्ज आहे. मिवी इंजीनिअर्स व ऑडिओ फाइल्सच्या समूहाने भारतीय ग्राहकांची संगीताप्रती अतीव आवड व रूची समजण्यासाठी अनेक महिने संशोधन केले आणि त्यानंतर त्यांच्या मनोरंजन गरजांची पूर्तता करण्यासाठी फोर्ट सिरीज डिझाइन केली. घरामधील मर्यादित जागा आणि बास आवाजाप्रती ग्राहकांची आवड लक्षात घेत दोन्ही साउंडबार्समध्ये इन-बिल्ट सबवूफर्स आहेत, जे कॉम्पॅक्ट असण्यासोबत सुस्पष्ट व विशाल बास आवाज निर्माण करतात.

हे उत्पादन मिवीच्या हैदराबाद येथील उत्पादन केंद्रामध्ये निर्माण करण्यात आले आहे. ग्राहक फक्त फ्लिपकार्ट व मिवी वेबसाइटवरून अग्रणी मिवी फोर्ट एस६० व एस१०० अनुक्रमे ३,४९९ रूपये व ४,९९९ रूपये किंमतीमध्ये खरेदी करू शकतात.

या साऊंडबार्समध्ये २.२ चॅनेल आहे, जे सर्वोत्तम सराऊंड साऊंड अनुभव देते. चित्रपट पाहत असाल, संगीत ऐकण्याचा आनंद घेत असाल किंवा गेम्स खेळत असाल २.२ चॅनेल सिस्टिम होम एंटरटेन्मेंट अनुभवामध्ये वाढ करण्यासाठी शक्तिशाली बाससह संतुलित आवाजाची निर्मिती करते. सडपातळ व आकर्षक वॉल-माऊंण्टेड साऊंडबार्स रूमच्या आकर्षकतेमध्ये सामावून जाण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.

तसेच या साऊंडबार्समध्ये सुलभ प्लग-अॅण्ड-प्ले पर्यायासह विविध इनपुट मोड्स, ब्ल्यूटूथ, एयूएक्स, कोअॅक्सियल व यूएसबी आहे, ज्यामधून घरामध्येच आरामात सिनेमॅटिक अनुभव मिळण्याची इच्छा असलेल्या युजर्सना परिपूर्ण पॅकेज मिळते. मिवी फोर्ट एस६० व एस१०० सोबत रिमोट कंट्रोल देखील येतो, जो फंक्शन्स व व्हॉल्युम से‍टिंगवर नियंत्रण ठेवण्याची सुविधा देतो. तसेच मिवी फोर्ट एस६० व एस१०० मध्ये म्युझिक, मूव्हीज व न्‍यूज हे तीन साऊंड मोड्स आहेत, जे युजर्सना ते पाहत असलेल्या मनोरंजनानुसार त्यांच्या पसंतीचे साऊंड सेटिंग्ज निवडण्याची सुविधा देतात.

मिवीच्या सह-संस्थापक व सीएमओ मिधुला देवभक्तुनी म्हणाल्या, “ग्राहक तंत्रज्ञानासंदर्भात भारतीय बाजारपेठेत प्रबळ मागणी दिसण्यात येत आहे. पण दुर्दैवाने भारतीय ग्राहकांच्या गरजांकडे फारसे लक्ष देण्यात येत नाही. आम्ही रि-ब्रॅण्डेड उत्पादनांची विक्री केली आहे, जी पश्चिमेसाठी निर्माण करण्यासोबत चीनमध्ये उत्पादित करण्यात आलेली आहेत. आम्हाला साऊंडबार्सच्या फोर्ट सिरीज लाँच करण्याचा अभिमान वाटतो, जी मेड इन इंडिया असण्यासोबत मेड फॉर इंडिया आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: