शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी

मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी अटकेत असलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसाची म्हणजेच 11 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अटकेत असलेल्या 109 एसटी आंदोलकांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मुंबईतील किल्ला कोर्टात या प्रकरणी आज सुवानवी झाली.

चितावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करीत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याउलट प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या एसटी आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलकांना जामीनासाठी न्यायालयात अर्ज करता येईल. 

सदावर्ते यांची बाजू अॅ ड. महेश वासवानी यांनी बाजू मांडली तर सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप  घरत यांनी बाजू मांडली. यावेळी सरकारी वकिलांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते  यांच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी आंदोलकांनी हल्ला केल्याची घटना घडली. त्यानंतर या प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आले. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. मुंबईतील गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर त्यामुळे आयपीसी कलम 353 (सरकारी कामात अडथळा, 120 B समान हेतू) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: