चीनचा उदय आणि जागतिक राजकारणावरील परिणाम’ या विषयावर दोन दिवसीय परिषद

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाकडून आयोजन

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, सेंटर फॉर चायना अनलिसिस अँड स्ट्रॅटेजी, सेन्टर फॉर ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीक स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने चीनचा उदय आणि जागतिक राजकारणावरील परिणाम या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन सोमवार दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील शिवाजी सभागृहात होणार आहे. यावेळी एअर मार्शल भूषण गोखले, जयदेव रानडे, प्रा. डॉ. नितीन करमळकर, पीटर रिमेले कोनराड-एडेनॉअर स्टीफ्तुंग, डॉ. विजय खरे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.

या दोन दिवसीय परिषदेत चीनकडून वाढत्या धोक्याच्या संदर्भात तसेच या प्रदेशातील विकसित होत असलेल्या भु राजकीय परिस्थितीविषयी चर्चा केली जाईल. उद्घाटनावाशिवाय उर्वरित सत्रे जे. डब्ल्यु मेरिऍट येथे केवळ निमंत्रितांसाठी होतील.

या परिषदेत अनेक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये माजी राजदूत गौतम बंबावले, राजीव नारायणन, शान शी, अजित रानडे, किरण कर्णिक, एम.के.कोतवाल, भरत पांचाळ हे पहिल्या दिवशी आपले विचार मांडतील. तर दुसऱ्या दिवशी अरुण प्रकाश, सुदर्शन श्रीखंडे, डॉ.गुडरून वाकर, डॉ.शेषाद्री चारी, डॉ. श्रीकांत परांजपे, व्यंकटेश शर्मा, पंकज मदान आदी मान्यवर यावेळी आपले विचार मांडतील.

Leave a Reply

%d bloggers like this: