भारतीय खेळणी उत्पादकांच्या खेळण्यांचा दर्जा जागतिक दर्जाचा – डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे  : पुणे येथे टॉय ट्रेड असोसिएशन आयोजित दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवसाचे उदघाटन विधानपरिषद उपसभापती  डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, भारतीय खेळणी उत्पादन करणार्‍या उत्पादकांनी निर्मित खेळण्यांचा दर्जा जागतिक दर्जाचा अद्ययावत आहे. आपण असे समजतो की इतर देशांमधील खेळणी चांगली, मात्र आधुनिक तंत्रज्ञानाने विविध वयांतील मुलामुलींसाठी बनवलेली खेळणी जगातील बाजारात स्थान मिळवतील. कोविड कमी झालेल्या मुक्त अशा वातावरणात आगामी सुट्टी काळात पालकांना याचा लाभ घेता येईल. मुलांना खेळणी आवडतात तशीच ती मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने योग्य असतील असेच उत्पादक करण्याचा प्रयत्न करावा अशी सूचना देखील त्यांनी यावेळी दिली. या उत्पादकांना विकासासाठी मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे सहकार्य राहीलच. व्यापार्‍यांना व्यापार समरूद्धी याच्या बरोबरच सुरक्षितता मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी प्रतिपादन केले. या प्रसंगी टॉय ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद चव्हाण, उपाध्यक्ष बसंत जैन, सचिव राजेंद्र कवाड, फत्तेचंद रांका, शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुदडे आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रदर्शनात देशभरातील ५० उत्पादकांनी स्टॉल लावले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: