Friday, November 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

शरद पवारांच्या घरावरील भ्याड व चिथावणीखोर हल्ल्याचा तीव्र धिकाःर…  – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : वास्तविक एसटी राज्यकर्मचारी आंदोलना बाबत मा ऊच्चन्यायालयाने सुवर्णमध्य काढत न्याय्य निकाल दिल्यानंतर, एसटी कर्मचारी संघटनांनी गुलाल ऊधळल्याचे वृत्त देखील माध्यमात प्रसिध्द झालेत.. तसेच मविआ सरकारने देखील या विषयी सकारात्मक भूमिका घेऊन ‘संपावरील गैरहजर कर्मचाऱ्यांवर’ कारवाई न करण्याचे जाहीर करून नागरीकांची व प्रवाश्यांच्या सेवेत रूजू होण्याचे आवाहन देखील केले..
मा ऊच्चन्यायालयाने या प्रकरणी सुवर्ण-मध्य काढण्याची भूमिका घेतल्यामुळे या आंदोलनाच्या निमित्ताने अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याची संधी हातची गेली या भावनेने काही राजकीय पक्षांचा भ्रम निरास झाल्या मुळेच् हा चिथावणीखोर हल्ला झाला आहे.. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे जाहीर निषेध व राज्यस्तरीय ऊच्च पातळीवरील चौकशीची मागणी करत असल्याचे देखील काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात केली… एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनातील
आत्महत्याग्रस्त कुटुंबिय असोत, शेतकरी आंदोलनातील आत्महत्त्याग्रस्त कुटुंबिय असोत वा मराठा, ओबीसी आंदोलनातील
आत्महत्याग्रस्त कुटुंबिय असोत वा कोरोना काळातील पायपीटग्रस्त आत्महत्याग्रस्त मजूर बांधवांची कुटुंबिय असोत.. या सर्वांप्रती काँग्रेस पक्षास निश्चितच संवेदनशीलता व सहानुभूती असल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले परंतू अशाप्रकारे कोणाच्याही घरांवर दगडफेक करून मागण्या मान्य होत नाहीत त्यास घटनात्मक – कायदे प्रक्रीयेचा, मान्यतेचा आघार असावा लागतो.. हे आंदोलनकर्त्यांना समजून देखील ते नऊमजल्याच्या अविर्भावात द्वेष भावनेने हा भ्याड व निंदनीय हल्ला घडवला गेला.. याची पाळेनुळे शोधून राज्याची बदनामी करणाऱ्यांवर व चिथावणीखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील काँग्रेस करत असल्याचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यानी सांगितले..

 

Leave a Reply