नादब्रह्म सर्ववादक, जोगेश्वरी जॅग्वॉर्स, साई पॉवर्स हिटर्स, महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, गुरूजी तालिम टायटन्स्, राजाराम रायडर्स संघांची विजयी कामगिरी !
पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील मानांकित गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत नादब्रह्म सर्ववादक, जोगेश्वरी जॅग्वॉर्स, साई पॉवर्स हिटर्स, महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, गुरूजी तालिम टायटन्स् आणि राजाराम रायडर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली.
मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सिद्धेश क्षीरसागर याच्या नाबाद ८१ धावांच्या जोरावर नादब्रह्म सर्ववादक संघाने कसबा सुपर किंग्ज् संघाचा १७ धावांनी पराभव केला. आशिष शेंडगे याच्या कामगिरीमुळे जोगेश्वरी जॅग्वॉर्स संघाने मिडीया शुटर्स संघाचा ३७ धावांनी पराभव केला. चुरशीच्या झालेल्या सामन्यात साई पॉवर्स हिटर्स संघाने सुपर ओव्हरमध्ये गुरूजी तालिम टायटन्स् संघाचा पराभव करून सनसनाटी विजय मिळवला.
इतर सामन्यांमध्ये महालक्ष्मी मॅव्हरीक्स् संघाने मंडई मास्टर्स संघाचा; दगडुशेठ वॉरीयर्स संघाने युवा योध्दाज् संघाचा; महालक्ष्मी मॅव्हरीक्स् संघाने मिडीया शुटर्स संघाचा; गुरूजी तालिम टायटन्स् संघाने रंगारी रॉयल्स् संघाचा; राजाराम रायडर्स संघाने दगडुशेठ वॉरीयर्स संघाचा पराभव करून आगेकूच केली.
सामन्यांचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
१) नादब्रह्म सर्ववादकः ८ षटकात १ गडी बाद १३५ धावा (सिद्धेश क्षीरसागर नाबाद ८१ (२६, ७ चौकार, ८ षटकार), रोहन पवार ४८) वि.वि. कसबा सुपर किंग्ज्ः ८ षटकात ५ गडी बाद ६४ धावा (सम्राट रावते २३, सागर घोडके ११, कुणाल शेडगे १-७); सामनावीरः सिद्धेश क्षीरसागर;
२) जोगेश्वरी जॅग्वॉर्सः ८ षटकात ५ गडी बाद ७४ धावा (अनिकेत कारेकर २८, आशिष शेंडगे १३, सचिन जाधव २-१४) वि.वि. मिडीया शुटर्सः ७.५ षटकात १० गडी बाद ३७ धावा (अमित बिहानी १०, आशिष शेंडगे ३-२, तुशार आंबट ३-८, अनिकेत कारेकर २-४); सामनावीरः आशिष शेंडगे;
३) गुरूजी तालिम टायटन्स्ः ८ षटकात ८ गडी बाद ५९ धावा (निवृत्ती पोलेकर २४, राहूल सणस १८, राजेश पवार ३-५) सुपर ओव्हरमध्ये पराभूत वि. साई पॉवर्स हिटर्सः ८ षटकात ६ गडी बाद ५९ धावा (सागर आंग्रे नाबाद ३७, हरीश जाधव ८, यश ठाकूर २-२); सुपर ओव्हरः साई पॉवर हिटर्सः १ षटकात १९ धावा (सागर आंग्रे ११, महेश नानगुडे ७) वि.वि. गुरूजी तालिम टायटन्स्ः १ षटकात १० धावा (निवृत्ती पोलेकर ६, सुशांत मते ३); सामनावीरः सागर आंग्रे;
४) मंडई मास्टर्सः ८ षटकात ५ गडी बाद ६१ धावा (सुरज थोरात ४२, श्री यादव १०, शुभम खटाळे १-७, राहूल साखरे १-७) पराभूत वि. महालक्ष्मी मॅव्हरीक्स्ः ७ षटकात १ गडी बाद ६४ धावा (ओंकार भोपेळ नाबाद १८, शुभम खटाळे नाबाद २७, विवेक जांभुळकर १४, शुभम भोसले १-८); सामनावीरः राहूल साखरे;
५) दगडुशेठ वॉरीयर्सः ८ षटकात ८ गडी बाद ८३ धावा (कपिल राऊत ४०, अमोल चव्हाण २३, सागर जगताप २-१७) वि.वि. युवा योध्दाज्ः ८ षटकात ४ गडी बाद ६१ धावा (विद्युत पगारे २३, आकाश जामवाल १३, प्रकाश चव्हाण २-१६); सामनावीरः कपिल राऊत;
६) नादब्रह्म सर्ववादकः ८ षटकात ६ गडी बाद ५२ धावा (रोहन पवार नाबाद १७, सिद्धेश क्षीरसागर १९, रमेश जी. २-१५) पराभूत वि. साई पॉवर्स हिटर्सः ३ षटकात १ गडी बाद ५४ धावा (सागर थरकुडे १९, महेश नानगुडे नाबाद २७, कुणाल शेडगे १-२९); सामनावीरः हरीश जाधव;
७) मिडीया शुटर्सः ८ षटकात ४ गडी बाद ६१ धावा (गोपाळ गुरव २६, सचिन जाधव १७, धीरज ढगे १५, चारू भैरट १-४) पराभूत वि. महालक्ष्मी मॅव्हरीक्स्ः ५.३ षटकात १ गडी बाद ६४ धावा (विवेक जांभुळकर १५, शुभम खटाळे नाबाद २५); सामनावीरः शुभम खटाळे;
८) रंगारी रॉयल्स्ः ८ षटकात १ गडी बाद ७९ धावा (प्रफुल्ल मानकर ३२, राज वीरकर नाबाद ३०, स्वराज पोकळे १-६) पराभूत वि. गुरूजी तालिम टायटन्स्ः ७.५ षटकात २ गडी बाद ८० धावा (निवृत्ती पोळेकर नाबाद ४५, रणवीर परदेशी १५, सदानंद बेन्द्रे १-६); सामनावीरः निवृत्ती पोळेकर;
९) दगडुशेठ वॉरीयर्सः ८ षटकात २ गडी बाद ७८ धावा (अमोल चव्हाण ३७, कपिल राऊत २७) पराभूत वि. राजाराम रायडर्सः ७.४ षटकात १ गडी बाद ८२ धावा (सागर फडतरे नाबाद ४७, विवेक गायकवाड नाबाद १४); सामनावीरः सागर फडतरे;
