Sunday, November 8, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

एसटी कर्मचाऱ्यांचं आजचं आंदोलन म्हणजे राज्याचे संस्कार नाहीत – संभाजी राजे

पुणे : एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावं, ही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी राज्य सरकारनं अमान्य केल्यानं आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी धडक दिली.
यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजीही केली. त्यामुळं या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर राज्यसभेतील खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे म्हणाले, मी आजच दिल्लीहून पुण्याला आलोय आणि एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन पहायला मिळालं. आंदोलन करण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे. मात्र, हे शोभणारं नाहीय. हे महाराष्ट्राचे संस्कार नाहीयत. एसटी कामगारांच्या बाजूंनी आम्ही ठाम आहोत; पण हे आंदोलन म्हणजे राज्याचे संस्कार नाहीयत. असं मत त्यांनी पत्रकाराशी बोलताना व्यक्त केलं.

Leave a Reply