मावळ तालुक्यातील उद्योजक उमेश मांढरे यांचा संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश

पुणे:मावळ तालुक्यातील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते शिवश्री उमेश मांढरे यांनी संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश केला,संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांच्या उपस्थित उमेश मांढरे यांनी संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश केला.
१३ एप्रिल रोजी मावळ भागात मेळावा घेणार असून त्या मेळाव्यात शेकडो तरुण संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश करणार आहेत व संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून कामगारांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणार आहे असे संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश केल्यानंतर उमेश मांढरे यांनी सांगितले,
उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते उमेश मांढरे यांच्या प्रवेशामुळे मावळ तालुक्यात संभाजी ब्रिगेडची मोठी ताकत वाढणार आहे असे मत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी वेक्त केले. यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा सचिव निलेश ढगे, वाहतूक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विजय कदम, उद्योजक आबा मांढरे, उद्योजक नाथाभाऊ जाधव, संतोष आरगडे, निलेश कांबळे, उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: