चित्रपटमाध्यमातून संस्कृतभाषेचा प्रसार देश, संस्कृतीला पोषक दिग्पाल लांजेकर यांचे मत

पुणे: ‘चित्रपट हे जनमानस घडविण्याचे अत्यंत प्रभावी साधन आहे. संस्कृत ही देवभाषा आणि ज्ञानविज्ञानाची भाषा आहे. तिचा प्रसार या ‘शॉर्टफिल्म फेस्टिव्हल’द्वारे संस्कृत भारती करत आहे हे अभिनंदनीय आहे’ असे प्रतिपादन चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केले

संस्कृत भारतीच्या वतीने आयोजित लघुचित्रपटोत्सवात उद्घाटन सत्रात लांजेकर बोलत होते. मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघात झालेल्या या महोत्सवात देशविदेशातून आलेले ३० लघुचित्रपट सहभागी झाले होते.
लांजेकर म्हणाले, ‘शिवछत्रपतींचे चरित्र लोकांसमोर मांडून आम्ही राष्ट्रभक्ती जागविण्याचे काम करत आहोत. संस्कृतचा प्रभावी उपयोग मी माझ्या चित्रपटातून केला आहे. संस्कृतमुळे आपली मांडणी प्रभावी होते. माझ्या चित्रपटातील संस्कृत गाणी लोकानी रिंग टोन म्हणून वापरली आहेत.’ संस्कृत भारतीचे प्रांताध्यक्ष चन्दशेखर वझे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: