वसंत मोरेंना थेट मुख्यमंत्र्यांनी दिली ऑफर मोरे शिवसेनेत जाणार का राष्ट्रवादीत?
पुणे:मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर सर्वाधिक चर्चेत आलेले वसंत मोरे यांची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांना या पदावरुन हटवल्यानंतर मोरे यांनी आपल्या पक्षात येण्याच्या इतर पक्षांनी ऑफर दिल्या होत्या. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली होती .आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शिवसेनेची ऑफर दिली आहे.
दरम्यान युवा शिवसेना नेते वरुन देसाई यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधत शिवसेनेत येण्याची ऑफर दिला आहे. शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
मात्र, आता येऊ घातलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे मोरे नाराज असून ते आपल्या पक्षात येतील का? यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. अशातच आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच वसंत मोरेंना शिवसेनेमध्ये येण्याबाबत पुनर्विचार करावा असा सल्ला दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.
