Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

Pune – मनसेत नाराजी नाट्य सुरूचं शहर उपाध्यक्षांचा राजीनामा

पुणे:मनसेचे नेते वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर आता पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राजीनामा दिला आहे. अझरुद्दीन सय्यद यांच्यासह आतापर्यंत चार पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिल्याचं कळतंय. मातोश्रीवर येण्याचं निमंत्रणही वसंत मोरे यांना पाठवण्यात आलंय. त्यामुळे वसंत मोरे ‘मातोश्री’वर जाणार का, वसंत मोरे शिवबंधन बांधणार का ?, हे पाहणं महत्वाचं ठरेल. एकूणच, मनसेमध्ये राजीनामा सत्र सुरु झाल्याची चर्चा आहे. मनसेचे नेते वसंत मोरे आणि पुणे मनसे शहर उपाध्यक्ष यांच्या राजीनाम्यामुळे मनसेसमोर आणखी एक संकट उभं राहिलंय.
सय्यद राजीनामा देताना म्हणाले, खरं तर कधी अशी परिस्थिती समोर येईल असं वाटलं नव्हतं. मात्र आपण ज्या पक्षात काम करतो, ज्या पक्षाला आपलं सर्वस्व समजतो तोच पक्ष जर आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भूमिका घेत असेल. आणि स्वतः पक्षाध्यक्षच जर भुमीका घेत असतील तर नक्कीच पक्षाला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याची वेळ आली आहे. बरं पक्षाध्यक्षांच्या भूमिकेला विरोध सोडा साधी नाराजी व्यक्त करायचा अधिकार नसावा? वसंत तात्या मोरेंना उभा महाराष्ट्र ओळखतो,काय चुकलं तात्यांच?

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading