Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज ठाकरे यांच्या हातात जितके झेंडे तेवढे रंग हे आत्ता सर्वांना माहीत – विजय वडेट्टीवार


पुणे: .महाराष्ट्र हे पुरोगामी विचारसरणीचा महाराष्ट्र आहे.राज्याचा इतिहास पुढे नेण्याचं काम हे आपण केलं पाहिजे कोणी जर हा वेगळं स्वरूप देण्याचं काम करत असेल तर ते  चुकीचं आहे.राज ठाकरे यांच्या हातात तिसरा झेंडा आहे.जितके झेंडे तेवढे रंग हे आत्ता सर्वांना माहीत झालं आहे. असा टोला मदत व  पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार  यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांना लगावला.
विजय वडेट्टीवार आज पुण्यात राज्यात विविध प्रकल्पाच्या बैठका घेण्याकरिता आज पुण्यात आले आहेत तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.


राज्यात महाविकासआघाडी मधल्या मंत्र्यांवर केंद्रीय ग्रुह यंत्रणाचा वापर करून मा विकास आघाडी मधल्या मंत्र्यांवर ईडीच्या कारवाया होत आहेत. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले,ज्या प्रमाणे राज्यात ईडी सीबीआय तसेच केंद्रीय यंत्रणेचा वापर दिसत आहे तस देशातील इतर राज्यात ते दिसत नाहीये.यासर्वांचा राजकीय वापर होऊ लागलं आहे.सत्ता येत असते जात असते.धोरणांवर विकासावर चर्चा होत असते.पण अस होत नाही.सध्या लोकशाही दिशाहीन करण्याचं काम सुरू आहे.जे पेरताय ते उद्या उगणार आहे असं यावेळी वडेट्टीवार हे म्हणाले.

काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात विजेची मागणी आणि उपलब्धता यावर काल चर्चा झाली.28 हजार मेगावॅट ची मागणी आहे 4 हजार चा तुटवडा आहे.लोड शेडिंग उद्यापासून ला सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती दिसतेय.राज्यातून गुजरात, कर्नाटक मध्ये बातमी  कोळसा निर्यात होतोय असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी प्रत्येक राज्यात इंग्रजी ऐवजी हिंदी बोललं पाहिजे असं म्हटलं आहे यावर वडेट्टीवार म्हणाले की राज्यात मराठी भाषा ही अस्मितेची भाषा आहे.हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे.अमित शहा यांनी जे काही बोलले आहे ते योग्यच आहे.असं देखील यावेळी वडेट्टीवार म्हणाले.
ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने नवीन आयोग नेमला आहे. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले,3 महिन्यात डेटा गोळा होईल, त्यांना गरज असेल तर वेळ वाढवून देऊ.
आयएनएस विक्रांत बचाओ निधीचा अपहार किरीट सोमय्या यांनी केला आहे असा ईडी नेआरोप केला आहे. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले,विक्रांत साठी गोळा केलेला पैसा तिथपर्यंत पोहचलेला नाही.त्याचा हिशोब कुठेय. असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी  उपस्थित केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading