fbpx

गौरव देशपांडे यांना जोतिर्विद्यावाचस्पती उपाधी प्रदान

पुणे : सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगाचे गौरव देशपांडे यांना नुकतीच बंगळुरू येथील कुडली श्रृंगेरी पीठातर्फे ज्योतिर्विद्यावाचस्पती उपाधी प्रदान करण्यात आली. कुडली श्रृंगेरी पीठाचे अकरावे शंकराचार्य पीठाधिपती श्रीश्री विद्याविद्येश्वर भारती यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. कर्नाटकातील धारवाड येथे झालेल्या कार्यक्रमात मानपत्र, शाल व पगडी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी धारवाड मठाचे राजेश्वर शास्री जोशीदेखील उपस्थित होते.

भारतीय खगोलशास्रावर आधारित या पंचांग अभ्यासाची दखल घेत गौरव देशपांडे यांना श्रृंगेरी पीठातर्फे ज्योतिष अभ्यासातील ही सर्वोच्च उपाधी देण्यात आली आहे. गौरव देशपांडे सॉफ्टवेअर इंजिनीअर असून गेल्या अकरा वर्षांपासून देशपांडे पंचांग प्रकाशित करीत आहेत. श्रृंगेरी पीठातर्फे ज्योतिषशास्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात येतो. भारतीय खगोलशास्रावर आधारित पंचांग अभ्यासाची दखल घेत यंदा ही उपाधी देशपांडे यांना प्रदान करण्यात आली आहे. याआधादेखील देशपांडे यांचा विविध पीठे आणि संस्थांतर्फे सन्मान करण्यात आला आहे. १४ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर अजूनही आपला आयटी व्यवसाय सांभाळून ते पंचांग आणि ज्योतिषशास्र यात उल्लेखनीय काम करत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: