fbpx

पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस ची कोअर कमिटी जाहीर


पुणे:काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आता पुणे महापलिका निवडणुकित लक्ष घालणार असून. या निवडणुकीसाठी आपली रणनीती व फौज उभारण्यासाठी पुणे शहर कॉंग्रेसला एक कोअर कमिटी करून देण्यात आली आहे .
शहर विकासाचा मास्टर प्लान करणे ,शहरातील प्रश्न व समस्यांची माहिती ,तसेच महापालिकेत सत्ताधारी पक्षाने केलेल्या गैरकारभाराची माहिती जनतेसमोर मांडणे,कॉंग्रेस पक्षाने केलेल्या विकास कामांची यादी जनते समोर ठेवणे , निवडणुकीकरता इच्छुक उमेदवारांचे पॅॅनल तयार करणे इत्यादी कामाकरिता ही कमिटी करण्यात आली आहे . काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात शहर कॉंग्रेसला पाठविलेल्या पत्रामध्ये या कमिटीच्या अध्यक्षपदी माजी गृहराज्यमंत्री, विद्यमान शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांची आणि या कोअर कमिटीचे मुख्य समन्वयक म्हणून भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आहे . तर सहसमन्वयक म्हणून औरंगाबादच्या संजय राठोड यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे .

कमिटीच्या सदस्य पदी माजी आमदार मोहन जोशी , ज्येष्ठ नेते  उल्हासदादा पवार ,माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, त्यानंतर अभय छाजेड, माजी महापौर आणि माजी आमदार दीप्ती चौधरी , काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, , माजी नगरसेवक संजय बालगुडे ,  कमल व्यवहारे , काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्ष पूजा आनंद ,माजी नगरसेवक मुक्तार शेख , त्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते , काँग्रेसचे गटनेते आबा बागुल , माजी नगरसेवक वीरेंद्र किराड या सर्वांची या कोअर कमिटीवर सदस्य पदी नेमणूक करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: