Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आम्ही रोजगार वाढीवर भर देणार – आदित्य ठाकरे


पुणे : परवा एका जाहीर भाषणात महानगरपालिका निवडणुकीत मनसे भाजप  युती होऊ शकते असे यावेळी राज ठाकरे हे म्हणाले. यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे पण आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले. आम्ही पुण्यात रोजगार वाढीवर भर देणार आहोत असे आदित्य ठाकरे आज पुण्यात पत्रकारांना म्हणाले.

पर्यायी इंधन परिषद दोन दिवसापासून पुण्यात चालू आहे विविध मंत्री व विविध नेते या या परिषदेत येऊन गेले आहेत. त्यावर पुण्यात 2 दिवसीय इंधन परिषद यशस्वी होताना दिसत आहे.काल या परिषदेला 15 ते 16 देशातील लोकांनी सहभाग घेतला होता.ही इंधन परिषद वेगवेगळ्या देशातील लोकाना बघता यावी.ही बातमी राजकीय नसतांनाही माध्यमांनी पण भरपूर सपोर्ट केला. असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आपल्या देशात इंधन प्रकल्प अख्ख्या भारतात उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी या परिषदेमध्ये मोठमोठ्या कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
इलेक्ट्रिक गाड्या सगळ्यांना वापरता यावेत यासाठी आम्ही देशातल्या मोठमोठ्या कंपन्यांची चर्चा करत आहोत असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading