fbpx

टीसीआयची २५० कोटींच्या भांडवली खर्चाची सज्जता

मुंबई : भारताची अग्रगण्य इंटिग्रेटेड सप्लाय चेन अँड लॉजिस्टिक सोल्यूशनप्रोव्हायडर कंपनीट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (“टीसीआय“)पुढील वित्तीय अर्थात आर्थिक वर्ष २३साठी सुमारे २५० कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची सज्जता करण्याची योजना आखत असल्याचे कंपनीने आज जाहीर केले. एकूण कॅपेक्स (भांडवली खर्च) पैक १००-१२५ कोटी रुपये जहाजे आणि कन्टेनर्सवर खर्च केला जाईल. कंपनी आपल्या टॉप लाइनमध्ये १२-१५ टक्क्यांची तर बॉटम लाइनमध्‍ये २० टक्क्यांच्या वाढीची अपेक्षा आहे.

टीसीआयचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. विनीत अगरवाल, “पुढील आर्थिक वर्षामध्ये आमचा भांडवली खर्च सुमारे २५०कोटी रुपयांचा राहील अशी अपेक्षा आहे. यापैकी १००-१२५ कोटी रुपये जहाजे व कन्टेनर्ससाठी खर्च केले जातील आणि अर्थातच काही रक्कम कदाचित ३०-५० कोटी रुपये ट्रक्सवर खर्च केले जातील. शिवाय आम्ही गोदामे उभारण्यासाठीही खर्च करणार आहोत – त्यासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांचा खर्च येईल.

सध्या पायाभूत सोयीसुविधांमध्ये होत असलेली वाढ पाहिली तर ती बहुमार्गी असल्याचे दिसून येईल. त्यातून आमच्या रेल्वे व्यापार आणि समुद्रीमार्ग व्यापाराला चालना मिळू शकेल. ग्राहकांच्या मागणीमध्ये बदल होत असल्याचे आम्हाला दिसत आहे. सर्वसाधारण मालवाहतूक तर सुरूच आहे. आमचा रेल्वेवाहतुक व्यापारही तुलनेने चांगला चालला आहे. तेव्हा, बाजारात येऊ घातलेल्या तेजीचा फायदा घेण्यास आम्ही ब-यापैकी सुसज्ज आहोत, असा या सगळ्याचा अर्थ आहे.”

पंतप्रधानांच्या गती शक्ती उपक्रमाचा उल्लेखही श्री. अगरवाल यांनी केला. वाहतुकीचा खर्च कमी करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. बहुलकी अर्थात मल्टिमोडल वाहतुकीवर भर दिला गेला तरच हे शक्य होऊ शकेल असे ते म्हणाले. “वर्ष पुढे जाता जाता आमच्या टॉपलाइन वाढीमध्ये १२-१५ टक्के वाढ होईल तर बॉटम लाइनमध्ये कदाचित २० टक्क्यांची वाढ होईल अशी आमची अपेक्षा आहे. तेव्हा दळणवळणाची किंमत खाली आणायची असेल तर बहुलकी कार्यपद्धतीचा स्वीकार व्हायलाच हवा.या दृष्टीने चाललेल्या सर्व प्रयत्नांमध्ये आणि भारताची मल्टिमोडल यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने चाललेली सर्व कामे यांचा समन्वय साधला जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मल्टीमोडल पद्धतीच अंगिकार करणे याचा अर्थ वाहतुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांचा आपल्याला अखंडितपणे वापर करता येणे. वाहतुक पुरविणारे तसेच ग्राहक या दोहोंसाठीही ही प्रक्रिया विनासायास पार पडली पाहिजे.”

Leave a Reply

%d bloggers like this: