लघु उद्योजकांनी व्यवहार सामंजस्याने सोडवावे कायदा हातात घेऊ नये – मिलिंद कांबळे
पुणे : करोनामुळे लघु उद्योगांच्या व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे तंट्यात वाढ होताना दिसून येत आहे. तेव्हा लघु उद्योगांनी संयम पाळणे आवश्यक आहे. व्यवसायातले व्यवहार व देवाण घेवाण सामंजस्याने सोडवावेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पदमश्री डॉ मिलिंद कांबळे यांनी भोसरी येथील लघु उद्योजकांच्या बैठकीत आवाहन केले.
भोसरी एम आय डी सी मधील स्टार पॉलिमर या कंपनीच्या प्रमुख जयश्री नेटके या महिला उद्योजिकेला किरकोळ व्यवहारातून मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील लघु उद्योजक आणि कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्शवभूमिवर डिक्की या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे, तसेच भारत सरकारच्या लघु उद्योग मंत्रालयाचे प्रतिनिधी या नात्याने त्यांनी परिसरातील उद्योजकांना मार्गदर्शन केले.
भोसरी परिसरातील उद्योजकांना कोणतीही अडचण आल्यास तातडीने पिंपरी चिंचवड चे कार्यक्षम पोलीस आयुक्त तसेच डिक्कीचे पिंपरी चिंचवडचे कोऑर्डीनेटर अनिल सौदडे यांना संपर्क करण्याचे आवाहन केले. जयश्री नेटके यांच्या प्रकरणात कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त यांनी तातडीने लक्ष घालून कारवाई केल्याबद्दल या बैठकीत आभार व्यक्त करण्यात आले.
