fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : NCBचे साक्षीदार प्रभाकर साईल यांचा मृत्यू

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB चे साक्षीदार प्रभाकर राघोजी साईल (वय 37) यांचा मृत्यु झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने चेंबूरमधील माहूल गाव येथे चंद्रा या खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. मात्र, त्यांनी NCB वर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर प्रभाकर यांच्या मृत्यू हा घातपात तर नाहीना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.    

कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक केल्यानंतर या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल हे चर्चेत आले होते. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावी याचा प्रभाकर साईल हा बॉडीगार्ड होता. 30 जुलै 2021 रोजी तो गोसावीच्या ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये पहिल्यांदाच गेला होता. त्यावेळी इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय असल्याचे गोसावीने त्यांना सांगितले होते.

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यात त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. के पी गोसावी आणि सॅम डिसुझा यांचे फोनवरील संभाषण मी ऐकले होते. २५ कोटींचा बॉम्ब टाका, १८ कोटीपर्यंत डील फायनल करुन त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, अस या दोघांमध्ये संभाषण झाल्याचे साईल याने दावा केला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading