फॅन्टसी अखाडाद्वारे आयपीएल मोहिमेचा शुभारंभ

मुंबई : देशभरात आयपीएलचा उत्साह सुरू झाला असताना फॅन्टसी अखाडा या भारतातील आघाडीच्या फॅन्टॅसी स्पोर्ट्स व्यासपीठाने सर्वांगीण मोहिम ‘खेळ तुम्हारा अखाडा हमारा’ सुरू केली आहे. क्रिकेट समालोचक हर्षा भोगले आणि सुप्रसिद्ध भारतीय अभिनेता अली फझल असलेल्या या मोहिमेला भारतीय व जागतिक बाजारपेठांमध्ये लॉंच केल्यापासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

फॅन्टसी अखाडाचे संस्थापक सुमित कुमार झा म्हणाले, “देशातील बहुप्रतिक्षित क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यासह निश्चितच फॅन्टसी स्पोर्ट्स स्पर्धांमधील प्रचंड सहभागासाठी मंच सज्ज झाला आहे. आमची मो‍हिम क्रिकेटप्रेमींना त्यांचे स्वत:चे संघ तयार करण्याच्या प्रत्यक्ष रोमांचचा अनुभव घेण्यास प्रेरित करण्यासाठी स्थित आहे. ‘खेळ तुम्हारा अखाडा हमारा’ टीझरचे लॉंच संवादांना चालना देत आहे आणि भारतीय व जागतिक बाजारपेठांमध्ये सुपरहिट ठरली आहे. ही मोहिम उत्साहपूर्ण वातावरणाला कायम ठेवत आहे आणि आयपीएल सीझनदरम्यान सहभाग वाढवेल. आम्‍हाला विश्वास आहे की ही मोहिम अधिकाधिक फर्स्ट-टाइम युजर्सना देखील फॅन्टसी स्पोर्ट्समध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहित करेल. आयपीएलच्या १४व्या पर्वादरम्यान सीईएमध्ये १५० टक्क्यांची वाढ पाहता आम्ही यंदाच्या सीझनमध्ये आमच्या युजरवर्गात १०० टक्‍के वाढ होण्याची आशा करत आहोत.”

स्पर्धेच्या १५व्या पर्वामधील उत्साहादरम्यान फॅन्टसी अखाडाच्या मोहिमेने अनेक फॅन्टसी क्रिकेट व्यासपीठांना अनोखे आवाहन करण्यासाठी अनोखा दृष्टीकोन अवलंबला आहे. इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून मोहिमेच्या टीझरच्या लॉंचसह सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर ब्रॅण्डने डिजिटलवर लहान व्हिडिओचे अनावरण केले आणि त्यानंतर आयपीएलच्या उद्घाटनीय दिवशी टीव्ही जाहिरात लॉंच केली. या जाहिरातीने प्रेक्षकांमध्ये उत्साहपूर्ण उत्सुकता निर्माण केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: