उल्लेखनीय कार्यासाठी जावेद इनामदार यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान

पुणे : युवकांच्या संघटन कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जावेद इनामदार यांना  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत २२ राज्यांतून युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी सहभागी झाले होते. देशभरातून केवळ १० पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व जावेद इनामदार यांनी केले.

जावेद इनामदार वयाच्या १७ व्या वर्षांपासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. महाविद्यालयासह शहरातील इतर प्रश्नावर आंदोलन, संघटन व अन्य सामाजिक कार्यात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत २०१९ मध्ये त्यांना शहर उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: