fbpx

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या नूतन वास्तूचा भूमिपूजन समारंभ शनिवारी

पिंपरी : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीमधून इंद्रायणी महाविद्यालयाची नूतन वास्तू साकारत असून, या वास्तूचे भूमिपूजन संस्थेचे आधारस्तंभ, माजी आमदार मावळभूषण कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते येत्या शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे उपस्थित होते. भूमिपूजन समारंभासाठी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यशोदा महादेव काकडे असे नामकरण करण्यात आलेली ही नियोजित इमारत सात मजली असणार आहे. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, बीबीए, बीसीए, तंत्रशिक्षण या विभागांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा, वर्गखोल्या, संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, सभागृह आदी सोयीसुविधा असणार आहेत. या इमारतीमध्ये चार हजार विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील. त्यामुळे तळेगाव व मावळ तालुक्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडणार आहे, असेही चंद्रकांत शेटे यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: