S. Balan Trophy – पुनित बालन ग्रुप संघ, माणिकचंद ऑक्सिरीच संघांची विजयाची हॅट्रीक !

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघ आणि माणिकचंद ऑक्सिरीच संघ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत स्पर्धेत विजयाची हॅट्रीक नोंदविली.

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत सिध्दार्थ म्हात्रे याच्या ८६ धावांच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने रायझिंग डे इलेव्हन संघाचा ७४ धावांनी पराभव करून स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुपने २५५ धावांचा डोंगर उभा केला. सिध्दार्थ म्हात्रे याने सर्वाधिक ८६ धावांची खेळी केली. याबरोबरच अर्थव काळे (५९ धावा), ऋतुराज वीरकर (३७ धावा) आणि सागर सावंत (नाबाद २२ धावा) यांनी आपल्या फलंदाजीने तडाखा दिला. या आव्हानासमोर रायझिंग डे इलेव्हनचा डाव १८१ धावांवर मर्यादित राहीला. ओम साळुंखे याने १०४ धावांची खेळी केली. पण संघाचा पराभव टाळू शकली नाही.

अविनाश शिंदे याच्या ८३ धावांच्या जोरावर माणिकचंद ऑक्सिरीच संघाने गाडगे अँड कंपनी संघाचा ५४ धावांनी पराभव करून सलग तिसरा विजय मिळवला. माणिकचंद ऑक्सिरीच संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९ षटकात १६९ धावा धावफलकावर लावल्या. अविनाश शिंदे (नाबाद ८३) आणि पलाश कोंढारे (नाबाद ४८ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानासमोर  गाडगे अँड कंपनीचा डाव ११५ धावांवर मर्यादित राहीला. गोलंदाजीमध्ये ऑक्सिरीच संघाकडून अविनाश शिंदे (३-२१), अक्षय जाधव (३-२१) आणि निखील भोगले (२-१९) यांनी अचूक गोलंदाजी केली.

Leave a Reply

%d bloggers like this: