Thursday, August 13, 2026
Latest NewsPUNE

खास गुढी पाडव्या निमित्त ‘स्वर संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

 

दिग्गज कलाकारांचे प्रथितयश शिष्य कलाकार सादर करणार आपली कला

पुणे  : खास गुढी पाडव्याचे निमित्त साधत कलाश्री संगीत मंडळातर्फे व बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले यांच्या सहकार्याने ‘स्वर संवाद’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम शनिवार दिनांक २ एप्रिल रोजी सायंकाळी ५:३० वाजता मयूर कॉलनी कोथरूड येथील बाल शिक्षण शाळेच्या एमईएस सभागृहात संपन्न होणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे जेष्ठ शिष्य मिलिंद दाते (बासरी), पंडित शिवकुमार शर्मा यांचे जेष्ठ शिष्य धनंजय दैठणकर (संतूर) आणि उस्ताद अल्ला रखा यांचे पुत्र व शिष्य तसेच उस्ताद जाकीर हुसैन यांचे बंधू फझल कुरेशी (तबला) आदी प्रतिथयश कलाकार कार्यक्रमात आपली कला सादर करणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading