पुणे : हेमंत रासने यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाली 

पुणे : पुणे महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत 14 मार्च रोजी संपल्याने राज्य सरकारने  पालिका आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. मुदत संपल्याने पालिकाचे सर्व कारभार प्रशासक यांच्याकडे गेले आहेत. मात्र स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी त्यांचा अधिकार हा अबाधित असल्याचा दावा करीत पुणे महापालिकेच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. मात्र उच्च न्यायालयाने रासने यांची याचिका फेटाळली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले, पुणे महापालिकेवर प्रशासक नेमल्या नंतर स्थायी समितीसह इतर समित्यांची जबाबदारी प्रशासक नियुक्त व्यक्तीकडे सोपविण्याचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा हेमंत रासने यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला होता. त्यावर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी अट्टाहासाने स्थायी समिती रद्द होत नाही. यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती, परंतु उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली त्यामुळे विनाकारण महानगरपालिकेला विधी खात्याला जो खर्च झाला त्याला जबाबदार कोण? शेवटी रासने आपली हौस फिटली, पण महानगरपालिकेला मात्र आर्थिक बोजा पडला त्याला जबाबदार कोण? पण शेवटी हेमंत रासने यांची हौस फिटली असेच म्हणावे लागेल.

Leave a Reply

%d bloggers like this: